♦️शिरवळ मांड ओढ्यात पुन्हा एकदा जलपर्णी वनस्पतीचे जाळे, क्युलेक्स सारख्या डासांमुळे नागरिक त्रस्त…
▲ शिरवळ ता. 4 – शिरवळ सध्या शहरीकरणामुळे मोठ मोठे होत चालले आहे. वीर धरणाच्या काठावर वसलेलं हे गाव. याच वीर धरणाच्या मांड ओढ्यात असणाऱ्या कचरा डेपोमुळे प्रदूषणयुक्त पाणी ओढ्यात उतरल्यामुळे जलपर्णी वनस्पतींचे प्रादुर्भाव वाढत चालला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी गत वर्षी जलपर्णी कढण्याची मागणी केली होती त्यानंतर स्थानिक प्रशासनाला जाग येऊन उपाय योजना करण्यात आल्या होत्या.
याही वर्षी मांड ओढ्यात साट्वाई कॉलनी परिसरात हि वनस्पती अतिशय वेगाने वाढत असून हि ‘जलपर्णी वनस्पती’ दर पाच दिवसाला दुप्पट होणारी वनस्पती आहे. त्यामुळे येथील पाणी दूषित होऊन पानी निर्जीव झालेलं पाहायला मिळत आहे. या वनस्पती मुळे क्युलेक्स सारख्या डासांची निर्मिती होत आहे. हे डास रात्रीचे बाहेर निघत असून त्यामुळे या मांड ओढ्या लगत राहणारे सटवाई कॉलनी येथील लोकवस्तीत नागरिक या क्युलेक्स सारख्या डासामुळे त्रस्त झाले आहेत. या डासांच्या चाव्याने त्या ठिकाणी नागरिकांच्या अंगावर मोठ मोठे सूज येत नागरिक यामुळे बैचेन झाले आहेत.
🔺क्युलेक्स सारख्या डासांमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोखा..तर स्थानिक प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष…
या मांड ओढ्यात जलपर्णी वनस्पतीमुळे वाढत चाललेल्या क्युलेक्स सारख्या डासांची बहुसंख्य प्रमाणात निर्मिती होत आहे. त्यामुळे नजिकचे नागरिक या डासांमुळे त्रस्त असून अश्या प्रकारच्या डासांच्या चाव्याणे परिसरातील नागरिकांना “हत्तीरोग” सारखे दुर्मिळ आजार होण्याची दाठ शक्यता आहे.
शिरवळ गाव मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा युक्त असून या सटवाई कॉलनी परिसराकडे आरोग्याच्या दृष्टीने दुर्लक्षित भाग दिसत आहे. ग्रामपंचायत घनकचरा व स्वच्छता विभाग आणि प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य विभागाचे जाणीव पूर्वक दुर्लक्ष होत असताना दिसत आहे. सटवाई कॉलनी येथील नागरिकांकडून पाण्यात वाढत चाललेली जलपर्णी वनस्पती काढण्यासाठी वारंवार ग्रामपंचायत कडे साकडे घातले जात आहे. हि वनस्पती न काढल्यास भविष्य काळात येथील नागरिक आजाराने संक्रमित होण्याची दाठ शक्यता आहे, त्यामुळे यापुढे तरी ग्रामपंचायत शिरवळ व प्राथमिक आरोग्य केंद्र शिरवळ याकडे लक्ष घालणार की फक्त बघ्याची भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क- किरण मोरे (9011555123)