क्राईमताज्या घडामोडीसातारा जिल्हा

♦️सटवाई कॉलनी,शिरवळ येथे शिरवळ पोलिसांचा नाईट रुट मार्च…


शिरवळ, दि. २५- शिरवळ सटवाई कॉलनी परिसरात तरुणांमध्ये वाढत चाललेल्या गुन्हेगारी, झुंडशाही, हुल्लडबाजी याला आळा बसण्यासाठी शिरवळ पोलिसांनकडून २४ जून २०२४ रोजी रात्री ८ चे दरम्यान नाईट रुट मार्चचे आयोजन करण्यात आले.

           सदर रुट मार्चचे सर्व अधिकारी यांना परिसरात वाढत असलेली टवाळगीरी, गुन्हेगारी याला आळा बसण्यासाठी पोलीस स्टेशन मधील ठाणे अंमलदार, बीट अंमलदार यांना शिरवळ पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांनी सूचना दिल्या. त्यांनतर शिरवळ मधील सटवाई कॉलनी परिसरात तरुणांमध्ये गुन्हेगारी, झुंडशाही, हुल्लडबाजी अती प्रमाणात वाढत चाललेली असल्याच्या पाश्र्वभूमीवर शिरवळ पोलिसांचा रुट मार्च ताफा रात्री ८ वाजणेचे सुमारास सटवाई कॉलनी कडे वळवला. या संपूर्ण परिसरात रूट मार्च काढून पहाणी करण्यात आली.

         अश्याच पद्धतीने शिरवळ परिसरात तरुणांमध्ये टवाळगिरी वाढत चाललेली असून त्यामाध्यमातून गुन्हेगारी, झुंडशाही, हुल्लडबाजी रोखण्यासाठी व त्यातून कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये यासाठी शिरवळ पोलिसांनी कंबर कसली असून परिसरात भविष्यकाळात शांतता, सुव्यवस्था कायम रहावी यासाठी वेळोवेळी रुट मार्च काढण्यात येणार असून नागरिकांनी निर्धास्त रहावे असे आवाहन करण्यात आले.

          शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांचे मार्गदर्शनाखाली निघालेल्या रूट मार्च मध्ये स्वतः पोलीस निरीक्षक संदिप जगताप, पोलीस उपनिरीक्षक एस. जी. पांगारे, गोपनियचे नितीन नलवडे, अरविंद बाराळे ६ होमगार्ड यांनी सहभाग घेतला होता.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – किरण मोरे 9011555123


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page