♦️ शिरवळ मांड ओढ्याचे सकाऊ पुलाचे काम पूर्ववत सुरू? सुरू झालेले काम अद्यापही निकृष्टच…
▲ शिरवळ, दि. १९ – शिरवळ ते सट्वाई कॉलनी येथील लोकवस्तीच्या जोडणारा मांड ओढ्यातील रस्त्यावरती साकाऊ पुलाला जिल्हा नियोजन मंडळाच्या वार्षिक आरकड्यातून 60 लाख रुपये मंजूर झाले आहेत. सट्वाई कॉलनी वस्तीनजीक असलेल्या निर्माणाधीन पुलाचे बांधकाम यापूर्वी निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा आरोप नागरिकांमधून करण्यात आला होता. हे कामकाज निकृष्ट चालू असेल बाबत सत्यशोधक न्यूज ने मागे बातमी लाऊन चाललेला भोंगळ कामकाज उघड केले होते. आता त्या पुलाचे कामाला सुरवात पूर्ववत सूरवात झाली असून.
या साकाऊ पुलाला 60 लाख रुपये मंजूर झाले आहे. परंतु हे पुलाचे काम अंदाजे 29% कमी ने घेऊन पुलाचे बांधकामाज अंत्यत निकृष्ट दर्जाचे चालू असून पुलाच्या बांधकामात कमी सिमेंट जास्त प्रमाणत कच व खडी वापरून पुलाचे पिलर अंत्यंत जलद गतीने उभारून कामकाजाची निकृष्टता झाकण्याचा डाव संबधित कॉन्ट्रॅक्टर यांनी केला होता. या कामकाजा बाबत संबंधीत विभागाचे व विभागीय अधिकाऱ्याचे नागरिकांनी तक्रारी केल्या होती.
कॉन्ट्रॅक्टर यांचेशी स्थानिकांनी विचारणा केली व निविदेची मागणी केली असता उद्धट पने बोलून हुसकावून लावन्याचे प्रकार घडले होते त्यानंतर मध्यांतरी कालावधीत कामकाज काही कारणास्तव बंद होते. त्यानंतर आता पुन्हा कामाला सुरवात झाली असून त्याच पद्धतीने कमी सिमेंट जास्त प्रमाणात खडी व निकृष्ट कामकाज चालू असल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत संबधित अधिकारी यांना या चालू कामाबाबत विचारणा केली असता मी पाहणी करून घेतो असे सांगण्यात आले. अश्या चालू असणाऱ्या निकृष्ट कामावर कोणाचेच लक्ष नसल्याने उघड उघड फसवणूक केली जात आहे त्यामुळे भविष्यकाळात हा पूल किती काळ टिकेल हेच नागरिकांना पहावे लागणार आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क- किरण मोरे (9011555123)