♦️राजश्री शाहु महाराज जयंती विशेष…!
▲ संपादकीय दि. २६ – राजश्री शाहु महाराज जयंती विशेष – जनतेतील राजा आणि राजातील माणूस अशी जनमानसात ओळख असणारा, आरक्षण देणारा पहिला राजा मंजे कोल्हापूर संस्थानचे छत्रपती असणारे राजश्री शाहू महाराज यांची ओळख.
सनातनी वर्गाचा विरोध न जुमानता गोर – गरीब दलित, मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका त्यांनी बजावली. मागासवर्गीयांच्या शिक्षणावर अधिक भर त्यांनी दिला. शाहूंनी स्त्री शिक्षणासाठी राजआज्ञा काढून मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत केले, जे पालक आपल्या मुलांना शाळेत घालणार नाहीत त्यांना १ रू. दंड ठोकणारा लोकराजा राजश्री शाहू.
१९०१ साली मराठा समाजातील मुलासाठी व्हिक्टोरिया बोर्डीग शाहूंनी सुरू केले. बहुजनांच्या शिक्षणाविषयी तळमळ होती. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना उच्चशिक्षणासाठी विलायतेत पाठवण्यासाठी महत्वाची भूमिका त्यांनी घेतली. शाहूंनी बाबासाहेबांच्या मूकनायक वृत्तपत्रासाठी आर्थिक सहकार्य त्यांनी केले. अस्पृश्यांना समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून त्यांनी महार पैलवानांना पैलवान, चांभार यांना सरदार, अभंग यांना पंडित अशा पदव्या देऊन समाजात प्रतिष्ठा मिळऊन दिली.
शाहूंनी जातीभेद उच्चाटनासाठी आंतरजातीय विवाहास मान्यता देऊन विधवा पुनर्विवाहास कायदेशीर मान्यता मिळवून दिली. देवदासी प्रथा बंद केल्या. राजश्री शाहूंनी स्वतः आपल्या चूलत बहीणीचे लग्न धनगर समाजातील यशवंतराव होळकर यांच्याशी लाऊन 100 मराठा-धनगर आंतरजातीय विवाह लाऊन दिले.
शेतकऱ्यांसाठी राधानगरी धरणाची उभारणी करून शेतकऱ्यांना कर्जे उपलब्ध करून दिले. शेतीसाठी जोड म्हणून उद्योगधंद्यांची निर्मिती करून त्याला सहकार तत्वाची ऊर्जा दिली. राजर्षी शाहूना जनतेने कर्तव्यदक्ष, रसिक कलेचा, आश्रय दाता, बहुजनांचा आधार, कुशल व्यवस्थापक, जलनीती तज्ञ, मूर्तिमंत राजयोगी, आरक्षणाचे जनक, राजश्री अश्या पदव्या बहाल केल्या अश्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज भोसले घराण्याचे चौथे शाहू यांची आज जयंती… असा शाहूराजा पुन्हा होणे नाही.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123