♦️ शिवशंभू प्रिया जांभळे यांची स्वाभिमानी संघटनेचे महिला दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष पदी निवड…
▲ पुणे दि. २७ – स्वाभिमानी मराठा महासंघ या संघटनेचा पदाधिकारी निवडीचा कार्यक्रम पार पडला यामधे यापूर्वीचा स्वाभिमानी मराठा महासंघामध्ये कार्यरत असणाऱ्या शिवशंभू प्रिया जांभळे यांनी संघटनेशी प्रामाणिक राहून संघटना वाढीचे कार्य करीत आपले मोलाचे योगदान दिले त्याबद्दल त्यांची कामाची पोहच पावती म्हणून महाराष्ट्र राज्याच्या महिला दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष पदि निवड करून त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी नवनियुक्त शिवशंभू प्रिया जांभळे यांनी बोलताना म्हणाले की संघटनेने माझेवर विश्र्वास ठेऊन माझी संघटनेच्या महिला दक्षता आघाडी प्रदेश अध्यक्ष पदी निवड केली त्याबद्दल मी क्षतशा आभारी आहे यापुढेही मी जोमाने काम करून शेतकरी, विद्यार्थी, तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करेन व संघटना वाढीसाठी प्रयत्न करेन अशी आशा व्यक्त केली.
याप्रसंगी कार्यक्रम प्रसंगी स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष डॉ कृषी राज टकले यांचे हस्ते नियुक्त पत्र देण्यात आले यावेळी संघटनेचे निलेश दादा धुमाळ, अनिताताई पाटील, अलकाताई हरगुडे, ज्योतीताई सातव, मीराताई शिंदे, अश्विनीताई सावंत वैशालीताई भैरट, सविताताई थोरात, प्रतिभाताई, सीताताई आदी पदाधिकारी उपस्थित होते.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123