क्राईमब्रेकिंग न्यूजशिरवळ

♦️महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी ’ड्राय डे’ असताना शिरवळ परीसरात खुलेआम दारू विक्री..


शिरवळ दि. १५ – शिरवळ पोलिस स्टेशन गेले अनेक विषयांमुळे चर्चेत आले नंतर शिरवळ पोलिस ठाण्याचा ठाणेदार तडकाफडकी बदलण्यात आले. त्यानंतर शिरवळ पोलीस ठाण्यात नवीन कडक शिस्तीचे समजले जाणारे ठाणेदार आलेले असताना शिरवळ परीसरात ‘ड्राय डे’ दिवशी खुलेआम दारू विक्री होत असल्याचे चित्र पहायला मिळाले.
        शिरवळ शहर उत्सवप्रिय शहर म्हणून ओळखले जाते. त्यात या ग्रामिक कम शहरी होत चाललेल्या गावात अनेक प्रकारचे सण उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात, गणेश उत्सव, नवरात्र उत्सव, राम नवमी उत्सव, छत्रपती शिवाजी महाराज जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे कार्यक्रम हर्षउल्लासात होत असतात. या काळात शिरवळ शहरांमध्ये मोठमोठ्या मिरवणुका निघतात, ढोल-ताशा, लेझीम व पारंपरिक पद्धतीने मिरवणुक पार पडत असतात. अश्या उत्सवात शहरामध्ये मद्य विक्रीला मनाई आदेश काढला जातो. हे दिवस ड्रायडे म्हणून घोषित करुन या दिवशी मध्य विक्री करण्यास मनाई केली जाते. या दरम्यान वाईन शॉप बिअरबार बंद ठेवण्याचा आदेश दिले जातात परंतु याच आदेशाला ‘ड्राय डे’ दिवशी शिरवळ परिसरात हरताळ फासला जात असल्याचे पहायला मिळाले आहे.

          काल महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती अखंड राज्यभर ‘ड्राय डे’ म्हणून घोषित करण्यात आली होती. असे असताना शिरवळ पोलिस ठाणे परिसरात मोठ्या प्रमाणात राष्ट्रिय महामार्गावरील अनेक हॉटेल, धाब्यावर तसेच वाईनशॉप, बिअरशॉप येथे छुप्या मार्गाने खुलेआम ज्यादा दराने दारू विक्री केली जात असल्याचे चित्र दिसत होते. अश्या हॉटेल व धाब्यावर स्थानिक पोलीस प्रशासन कारवाई करण्यात कूचकामी ठरत असल्याचे पहायला मिळाले. 
        ड्रायडे दिवशी दारू विक्री ला मनाई असताना देखील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी खुलेआम दारू विक्री केली जाते ही बाब अतिशय गंभीर असून याच दारू विक्रीमुळे अनुचित प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते परंतु स्थानिक पोलीस प्रशासन आणी राज्यउत्पादन शुल्क अधिकारी यांच्या दुर्लक्षपणामुळे शिरवळ परिसरात ड्राय डे दिवशी खुलेआम दारू विक्री केली जात होती. त्यामुळे ड्राय डे दिवशी दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व धाबा चालकावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शिरवळ परिसरातील सुजान नागरिकांमधून केली जात आहे.

• नवीन ठाणेदार अवैध व्यावसायिकांवर कारवाई कधी.?

         त्यामुळे कडक शिस्तीचे समजले जाणारे नवीन ठाणेदार शिरवळ परिसरात छुप्या पद्धतीने आजूनही चालू असलेले अवैध व्यवसाय तसेच या ‘ड्रायडे’ दिवशी खुलेआम दारू विक्री करणाऱ्या हॉटेल व धाबा चालक, व्यावसायिकांवर कारवाई करणार कधी होणार; की अवैध व्यावसायिकांचे तारणहार होऊन त्यांचे वरदहस्त होणार हे पहाणे औसुक्त्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page