▲शिरवळ दि. २८ – बंगळुरू हत्याकांड मधील पत्नीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये भरुन घराला कुलूप लाऊन मुंबईचे दिशेने पळ काढणारा आरोपी शिरवळ पोलिसांच्या सतर्कतेने त्याच्या वाहनासह जेरबंद करण्यास बंगळुरू पोलिसांना यश आले असुन शिरवळ पोलिसांकडून सदर घटनेबाबत मिळालेली सविस्तर माहिती अशी की..
राकेश राजेंद्र खेडेकर वय 35 धंदा नोकरी राहणार जोगेश्वरी मुंबई हा मुंबई येथून त्याची पत्नी गौरी हिचेसह कामानिमित्त बनारगट्टा तेजस्विनी नगर बेंगलोर येथे राहण्यास गेले होते. दिनांक 26 मार्च 2025 चे रात्री राकेश याचेकडे पत्नी सौ. गौरी हिने पुन्हा मुंबईला जाण्याचा आग्रह धरला यावरून दोघांमध्ये शाब्दिक वादावादी झाली त्यातून गौरी हि भांडी आदळआपट करीत असताना आपले रूमसाठी भरलेले डिपॉझिट मिळणार नाही असे समजूत काढीत असताना हट्टाला पेटलेल्या गौरीने घरातील चाकू घेऊन राकेशला मारण्याची भीती दाखवली. त्याचा राग राकेश याला आल्याने त्याच चाकूने राकेशने पत्नी गौरीचे मानेवर गळ्यावर पाठीवर चाकूने सपासप वार केले.
त्यामुळे गौरी गंभीर जखमी होऊन लॉबीमध्ये निपचिप पडली. त्यानंतर राकेशला ती मृत झाल्याचा संशय आला. त्यामुळे राकेशने घाबरून जाऊन तिचे मृत शरीर घरातील मोठी बॅगमध्ये भरून घराचे बाथरूम बाहेर नेऊन ठेवली. त्यानंतर दि. 27 मार्च 2025 चे रात्री राकेश भीती पोटी स्वतःचे गाडीने मुंबई येथे निघण्यासाठी बेंगलोर येथून निघाला पत्नीचा खून केल्यामुळे राकेश मनात भीती वाढली त्याने वाटेत एका मेडिकल दुकानांमधून हार्पिक फीनाईल व झुरळ मारण्याचे औषध घेतले. त्यानंतर कराड लगत आलेवर त्याने बेंगलोर येथील रूम शेजारी राहणाऱ्या ओळखीच्या इसमाला फोन करून घडले प्रकाराबाबत माहिती दिली.
त्यानंतर पुढे मार्गक्रमण करीत असताना शिरवळ धनगरवाडी MIDC येथे येथील आलेवर त्याने भीतीने व त्याने केलेल्या कृत्याचा पश्चाताप होऊ लागल्याने सोबत असलेले सर्व कीटकनाशक व औषधे एकत्र करून पिले. त्याचा त्रास पाहून एका मोटरसायकल स्वाराने विचारपूस केली, राकेश याने औषध पिल्याची माहिती होताच त्या युवकाने तात्काळ त्याचे कारमधून शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. यावेळी हॉस्पिटलमध्येच हजर असणारे शिरवळ पो. स्टे. पोलीस ह. कुंभार यांनी राकेश याकडे विचारणा केली असता त्याने पत्नीचे खूणाबाबतचा प्रकार सांगितला. हा सर्व प्रकार शिरोळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे यांना समजतात त्यांनी तात्काळ सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांना ही माहिती कळविली.
सातारा जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी तात्काळ घटनेची गांभीर्य ओळखत बेंगलोर येथे संपर्क करून गौरीचे खुणाबाबत खात्री केली. तेथील संबंधित वरिष्ठ अधिकारी पोलीस स्टेशन इन्चार्ज व इतर संबंधितांचे फोन नंबर पोलीस निरीक्षक नलावडे यांना पुरविले व पुढील तपासकामी सूचना दिल्या. वरिष्ठांचे प्राप्त सूचनेनुसार पुढील कारवाई करून राकेश चे नातेवाईक व बेंगलोर येथील पोलीस अधिकाऱ्यांची संपर्क करून त्यांना आरोपीबाबतची व उपचार बाबतची माहिती दिली. राकेशला विषारी औषध पिले असल्याने त्याला तात्काळ अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठविले त्यानंतर त्यास बेंगलोर येथील पोलिसांच्या ताब्यात दिले
सदरची कामगिरी ही पो.अधीक्षक सातारा समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उ. पोलीस अधिकारी श्राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यशवंत कृष्णा नलावडे, पोलीस हवालदार कुंभार, प्रशांत धुमाळ, सुनील मोहरे पोलीस शिपाई दीपक पालेपवाड इतर यांनी पार पाडली.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – किरण मोरे मो. 9011555123.