क्राईमशिरवळसातारा जिल्हा

♦️शिरवळच्या त्या नवीन ठाणेदाराची जोरदार कामगीरी; वराह पालनाची चोरी करणारी टोळी जेरबंद..


शिरवळ दि. २४ – शिरवळ पोलिस ठाणे हद्दीतील मौजे पळशी, ता. खंडाळा गावचे हद्दीतील एका शिवारात फिर्यादी दत्तात्रय माने रा. शिरवळ ता. खंडाळा जि. सातारा यांचे मालकीचे वराह पालन शेड मधुन लहान-मोठे असे एकुन १८३ वराह दि. ०३/०१/२०२५ रोजी रात्रीच्या सुमारास चोरटयांनी पिकअप व्हॅनमधुन चोरी करुन नेले असले बाबत गुन्हा शिरवळ पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आला होता. 
         घटनेनंतर वराह चोरी करणारी टोळी घटनेच्या तब्बल तीन महिन्या नंतर या सराईत टोळीला जेरबंद करण्यात यश आले असुन हि वराह चोरी करणाऱ्या टोळीतील ८ जणांना जेरबंद करण्यात यश आले आहे. या वराह चोरी करताना वापरलेली वाहने तीन पीकअप वाहन धरून एकून १७ लाख रुपयांचा मुद्देमाल या घटनेत जप्त करणेत आलेला आहे. यातील दाखल घटनेतील आरोपी पैकी काहींवर मोका, दरोडा, जबरी चोरी, जीवे मारणेचा प्रयत्न, आत्महत्या करणेस भाग पाडणे असे विविध गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. या गंभीर स्वरूपाचे दाखल असलेले सराईत गुन्हेगार जेरबंद करण्यात शिरवळच्या त्या ठाणेदार व तपासी अधिकारी यांना यश आले आहे. 
            या दाखल गुन्हया बाबत शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती सविस्तर हकीकत अशी की, दिनांक ०३/०१/२०२५ रोजी रात्री ०१:०० वाजलेपासून पहाटे ०३:३० वाजताचे सुमारास, मौजे पळशी, ता. खंडाळा, जि. सातारा गावचे हद्दीतील शिवारात फिर्यादी दत्तात्रय माने रा. शिरवळ ता. खंडाळा जि.सातारा यांचे मालकीचे असणारे लहान-मोठे एकुन १८३ वराह दिनांक ०३/०१/२०२५ रोजीचे रात्रौ चे दरम्यान चोरटयांनी ३ पिकअप व्हॅनमधुन चोरी करुन नेले होते. त्यावेळी तेथे राखणाकरीता असलेले दोन प्रत्यक्ष साक्षीदार यांना मारहाण दमदाटी केली. वराह अनधिकृत रित्या पळवून नेहले. याप्रकरणी दाखल तक्रारी नंतर यातील आरोपी प्रकाश अशोक जाधव, वय ३१ वर्षे, मयुर अशोक जाधव, वय २१ वर्षे, सोन्या उर्फ विकास संजय पवार, वय २९ वय वर्षे, सचिन उर्फ बाळा तुकाराम जाधव, वय ४० वर्षे यांना दिनांक ०७/०१/२०२५ रोजी अटक करणेत आली होती. 
             नमुद अटक आरोपी व्यतीरिक्त आणखी ७ ते ८ आरोपीचा सहभाग असलेचे तपासात निष्पन्न झाले नंतर, त्या अनुशंगाने आरोपीचा शोध घेणे कामी स्वतंत्र टीम तयार करुन, पुणे जिल्हा हददीत कसोशीने गोपणीय रित्या, खास बातमीदारा मार्फत सखोल व बारकाईने तपास करीत असताना तसेच यापुर्वी अटक केलेले आरोपी प्रकाश अशोक जाधव, मयुर अशोक जाधव यांचे हालचालीवर लक्ष ठेवुन माहिती घेत असताना नमुद आरोपी यांनी चोरी केलेले वराह घेवुन जाणेसाठी ज्या पिकअप व्हॅन चालक यांचेशी संर्पक करुन भाडे दिले होते, त्या दिशेने तपास करुन, तीन पिक हॅन तसेच आरोपी यांचा शोध घेवुन दिनांक १९/०३/२०२५ तसेच दिनांक २१/०३/२०२५ रोजीचे दरम्यान यातील आरोपी नामे सुनिल वसंत जाधव, वय २७ वर्षे, पांडुरंग शिवाजी शिंदे, वय ३३ वर्षे, किरणपानसिंग शितलसिंग दुधाणी, वय ३७ वर्षे, ओमकार संतोष जाधव वय २४ वर्षे यांना अटक करण्यात आली आहे. सदर आरोपींकडून गुन्हा करते वेळी वापरलेली ३ पिकअप व्हॅन एकुन किंमत रुपये १७ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करणेत आलेला आहे. नमुद आरोपी यांनी चोरी करुन नेलेले वराह दुसरे ठिकाणी विक्री केलेचे तपासात निष्पन्न झाले आहे. यामध्ये आतापर्यंत एकुण ८ आरोपी करण्यात आले असुन अजुन आरोपीं असल्याची माहिती पोलिसांकडून मिळत असुन याबाबत अधिक तपास सुरु आहे.

      सदर कारवाई सातारा पोलीस अधीक्षक श्री, समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक श्रीमती कडुकर, फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राहुल थस, यांचे मार्गदर्शनाखाली शिरवळ पोलीस ठाणेचे रावडी पोलीस निरीक्षक श्री. यशवंत नलवडे, सहा पोलीस निरीक्षक श्री. महादेव सिद, सहा. फौजदार शशिकांत भगत, पोलीस कॉन्स्टेबल अरविंद बा-हाळे, पोलीस कॉन्स्टेबल मिलींद बोराटे यांनी केली असुन अटक आरोपी, क. ३,६,७, व ८ यांची दिनांक २६/०३/२०२५ रोजी पर्यन्त पोलीस कस्टडि प्राप्त असून, पुढिल तपास वरीष्टांचे मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक शिद शिरवळ पोलीस ठाणे हे करीत आहेत.

• शिरवळ पोलिसांचे आवाहन..

          या रेकॉर्डवरील आरोपीनी इतर जिल्हयातही अशा प्रकारचे गुन्हे केले असण्याची दाट शक्यता आहे किंवा अशा प्रकारचे गुन्हे कोणत्याही पोलीस स्टेशनला दाखल असल्यास किंवा वरील अटक आरोपी आपलेकडील दाखल गुन्हयात पाहिजे असल्यास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांचेशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page