क्राईमखंडाळाशिरवळ

♦️शिरवळ पुन्हा हादरलं; किरकोळ वादातून फळ विक्रेता युवकावर कोयत्याने हल्ला..


शिरवळ दि. २३ – शिरवळ एमआयडीसी परिसरात नुकतेच काही दिवसांपूर्वी एका युवकावर धारधार शस्त्राने हल्ला होऊन निर्घुण खुण झाल्याची बाब उघड झाली होती त्यानंतर पुन्हा आता किरकोळ वादातून पुन्हा एकदा शिरवळ परिसरात कोयत्याने वार झाल्याची घटना घडली असुन घटना स्थळावरून मिळालेली प्राथमिक माहिती अशी की.. 
शनिवारी (दि.२२) रोजी शिरवळ मधील रहिवासी तौफिक इब्राहिम बागवान वय २८ वर्ष या युवकाचा शिरवळ एसटी स्टँड लगत फळ विक्रीचा व्यवसाय असून सायंकाळी ९ वाजता सुमारास दुकान बंद करते वेळी ३ अनोळखी युवक केळी खरेदी करिता आले. त्यांनी केळी कॅरेटची मागणी केली, परंतु त्यांच्या झालेल्या किरकोळ वादावादीने अचानक दुकानातील असणारा कोयता घेऊन फळ विक्रेता यांचेवर हल्ला चढविला या हल्ल्यात फळ विक्रेता हा गंभीर जखमी झाला. विक्रेत्याने मोठ मोठ्याने ओरडत गर्दीचे ठिकाणी धाव घेतली. 

      धाव घेत असताना देखील हे ३ युवक त्याचा पाठलाग करत होते परंतु समोर लोकांची उपस्थिती पाहून त्या अनोळखी युवकांनी धूम ठोकली. फळ विक्रेत्यास खंडाळा तालुका रेस्क्यू टीम व स्थानिक नागरिक यांचे मदतीने तातडीने शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल येथे उपचारा करीता दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचारानंतर त्याला गंभीर इजा झाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव सीद, पो. हवालदार दत्तात्रय धायगुडे, पो. अंमलदार भाऊसाहेब दिघे, पो. हवालदार भिसे, अरविंद बाराळे, दिपक पालेपवाड, सूरज चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक संदीप जगताप यांनी तत्काळ हल्ल्यातील तपासाची सूत्रे जलद गतीने हलवत हल्लेखोराची प्राथमिक माहिती घेत त्याचा शोध घेण्यात सुरुवात केली.

या घटनेतील हल्लेखोराची प्राथमिक ओळख पटली असुन शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांनी आरोपीच्या शोधासाठी तपास पथके रवाना केली असुन आरोपीला तात्काळ अटक केली जाईल असे सांगून नागरिकांना आश्वस्त केले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page