▲शिरवळ दि. १४ – राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील म्हणून समजल्या जाणाऱ्या शिरवळ ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी अमोल आनंदा कबूले यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते उपसरपंच ताहेर काझी यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने त्यांच्या रिक्त जागी उपसरपंच पदाच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि. १४) रोजी दुपारी ११ वाजता सरपंच रवींद्र दुधगावकर यांच्या अध्यक्षतेखाली सदस्यांची बैठक बोलविण्यात आली. यावेळी उपसरपंच पदासाठी अमोल आंनदा कबुले यांचा निर्धारित वेळेत एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने अमोल कबुले यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली असून औपचारिकता बाकी. अमोल कबुले यांना सूचक म्हणून राहुल तांबे यांनी स्वाक्षरी केली आहे.
यावेळी शिरवळ ग्रामपंचायत सरपंच रविंद्र दुधगावकर, मा. शिरवळ ग्रामपंचायत उपसरपंच ताहेर काझी, ग्रामपंचायत सदस्य राहुल तांबे, आदी उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच अमोल कबुले यांनी उपस्थित सदस्यांचे आभार मानले. नागरिकांनी फटाक्यांच्या आतषबाजीत अमोल कबुले यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
याप्रसंगी राष्ट्रवादी शिरवळ शहर अध्यक्ष चंद्रकांत मगर, दिलीप कबूले, स्वप्नील अडसूळ, आनंदा कबूले, विजय पवार, बाळासाहेब जाधव, दादासाहेब कांबळे, दिलीपभाऊ गुंजवटे, बाळासाहेब कारळे, आयुब काझी, मुरलीधर उबाळे, अमोल जाधव, कुणाल बुदगुडे, अमोल मगर, मनोज कबूले, बंटी परबळ आदींसह ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.
नूतन उपसरपंच अमोल कबुले यांचे ना. मंत्री मकरंद (आबा) पाटील, माजी जि. प. अध्यक्ष उदय कबुले, माझी पं. स. सभापती राजेंद्र तांबे, ग्रामस्थ आदींनी अभिनंदन केले आहे.