क्राईमखंडाळाब्रेकिंग न्यूजशिरवळसातारा जिल्हा

♦️शिरवळ एमआयडीसीत पूर्व वैमनस्यातून युवकाची निघृण हत्या..


▲शिरवळ दि. १३ – शिरवळ एमआयडीसी परिसरात जुन्या वादातून एका २२ वर्षीय युवकाची रात्री ११ वाजनेचे सुमारास हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार घडला असुन अमर शांताराम कोंढाळकर वय २२, रा. वडवाडी, ता. खंडाळा, जि. सातारा असे मृत युवकाचे नाव आहे. तर या प्रकरणात तेजस महेंद्र निगडे वय १९, रा. गुनंद, ता. भोर, जि. पुणे याच्यावर हत्या केल्याचा संशय असून, याबाबात प्राथमिक मिळालेली माहिती अशी की..
काही दिवसांपूर्वी अमर आणि तेजस यांच्यात वाद झाला होता. या वादाचा राग तेजसच्या याचे मनात होता. याच वैमनस्यातून त्याने अमरवर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केला. घटनेनंतर तात्काळ स्थानिक पोलीस प्रशासनाने धाव घेतली. तेथील स्थानिक व पोलिसांनी अमरला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू करण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

• संशयीताने दिली स्वतः हत्येची कबुली ?
घटना केल्यानंतर तेजसने स्वतःहून धारधार हत्यारासह पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांसमक्ष गुन्ह्याची कबुली देत आत्मसमर्पण केले. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेत घटनास्थळाची पाहणी केली व तेजसणे सांगितलेल्या घटनेची पहाणी केली, त्यानंतर पोलिसांनी तात्काळ त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
• पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाची गंभीर दखल.. 
हत्येची माहिती मिळताच शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप जगताप, महिला पोलिस उपनिरीक्षक नयना कामठे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय धुमाळ, पोलिस हवालदार भाऊसाहेब दिघे, सूरज चव्हाण आणि दीपक पालेपवाड यांनी घटनास्थळी धाव घेतली. या घटनेची गंभीर दखल घेत उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनीही घटनास्थळी तात्काळ भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page