♦️शिरवळमध्ये पत्नीचा दुर्गावतार: अत्याचारी पतीला भर रस्त्यात दिला चोप.
▲शिरवळ दि.21 – शिरवळ येथील एका घटनेने सध्या सर्वत्र खळबळ माजवली आहे. एका महिलेला तिच्या पती कडून होणाऱ्या अत्याचारांचा भर रस्त्यात प्रतिकार करत धडा शिकवल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेने समाजात महिलांच्या सबलीकरणाबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
शहरातील मध्यवर्ती भागात घडलेल्या या घटनेत पीडित महिला आणि तिचा पती हा दलाल “मनमुराद” असल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा पती आपल्या पत्नीला अनेक दिवसांपासून मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता. वारंवार होणाऱ्या छळामुळे त्रस्त झालेल्या महिलेला अखेर हा अन्याय सहन झाला नाही. त्यानंतर तिने ठरवून पतीच्या अत्याचारांचा प्रतिकार करण्याचा निर्णय घेतला.
घटनेच्या दिवशी, पतीने सार्वजनिक ठिकाणी तिच्याशी पुन्हा वाद घालण्याचा प्रयत्न केला. मात्र, या वेळी पत्नीने संयम न राखता रस्त्यावरच त्याला चांगलाच चोप दिला. तिने तिच्या हातातील चपलांचा वापर करून पतीवर जोरदार हल्ला केला. उपस्थित नागरिकांनी या घटनेला साक्षी राहून त्या महिलेच्या धैर्याचे कौतुक केले. पतीने सतत अपमानास्पद वर्तन आणि अत्याचार केल्यामुळे तिच्या सहनशीलतेचा शेवटीं अंत झाला.