▲शिरवळ, खंडाळा दि.1– खंडाळा तालुक्याची मुलुख मैदानी तोफ असणारे नितीन भरगुडे पाटील यांचे बाबत वाई येथे आमदार मकरंद पाटील यांच्या सभेत भाषण करताना नितीन भरगुडे यांच्याविषयी बोललेल्या बेताल वक्तव्याबाबत बाळासाहेब सोळसकर व वसंत मानकुमरे यांनी लेखी पत्र काढत जाहिर माफीनामा सादर केला असुन यात नितिन बापू हे आमचे परम मित्र असुन चेष्टा करण्याच्या हेतूने अनावधानाने वैयक्तिक पातळीवर आम्ही बोलले गेलो मात्र त्यामध्ये त्यांचा अपमान करण्याचा कुठलाही हेतू नव्हता. अलिकडच्या काळात त्यांची तब्बेत ठीक नसते याची आम्हाला कल्पना आहे मात्र निवडणूकीत जोरदार प्रचारासाठी त्यांनी उतरावे यासाठी तब्बेतीचे कारण बाजूला ठेवावे असे सूचवण्याचा उद्देश होता. अनेकदा त्यांनी आमच्यावर बोलले तरी आम्ही मनाला लावून घेत नाही. बापूंनीही गैरसमज करून घेऊ नये. भाषणाला ती केवळ विनोदाची किनार होती. परंतु तरीही या वक्तव्यामुळे नितीन बापू आणी त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांची मने दुखावली गेली असल्यास आम्ही जाहीर माफी मागतो.
खंडाळा तालुक्यातील आपल्या हितचिंतकांच्या व विरोधकांच्या भावना दुखावल्या असल्यास मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. नितीन बापू आणि आमचे कौटुंबिक संबंध यापुढेही जिव्हाळ्याचेच राहतील. आम्ही एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी असतो. त्यामुळे त्यांच्या हितचिंतकांनी मोठ्या मनाने या विषयावर पडदा टाकावा ही नम्र विनंती करतो. असे जाहिर पत्र काढत माफीनामा सादर केला आहे.
▲बेताल वक्तव्यावर खंडाळावासीय आपल्या भूमिकेवर ठाम..
वाई येथील सभेत बाळासाहेब सोळसकर व वसंत मानकुमरे यांनी नितीन बापू यांच्यावर केलेल्या कुचेष्टा ही आमच्या जिव्हारी लागली असून हा संपूर्ण खंडाळा तालुक्याचा अपमान आहे. आज पर्यंत आम्ही खंडाळा तालुक्यातील जनता अपमान सहन करत आलो आहोतच, या केलेल्या अपमानावर विद्यमान आमदार यांनी एक चकार वाक्य देखील उद्गारले नसून या घटनेचे देखील आम्ही निषेध व्यक्त करतो. आणि आता हा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे आम्हीं आताच्या निवडणुकीत या वक्तव्याचा जाहीर निषेध करत असुन आम्ही याबाबत धडा शिकवले शिवाय राहणार नाही. तसेच नितीन बापूंनी जरी याबाबत मोठेपणा दाखवत माफी केली तरी आम्ही माफ करणारं नाही यासाठी आमचा निर्णय ठरला आहे..“ज्यांनी आपल्याला पाडलं; त्यांना पाडा..”
आमदार मकरंद पाटील यांच्या सभेत सावित्रीबाई फुले च्या मतदारसंघात महिला उमेदवार यांच्यावर देखील आमदार मकरंद पाटील यांच्या समक्ष बोल घेवड्यांनी अपमान केला आहे. एकीकडे महायुती सरकार महिलांसाठी गंभीर असल्याचा दावा करते परंतू इथे महायुतीतील आमदारासमोरच बहिणीसारख्या महिला उमेदवाराचें वाभाडे काढण्याचा प्रकार घडत आहे. त्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार केला जात आहे व या बाबत आमदार मकरंद पाटलांकडून साधी खंत देखील व्यक्त केली नाही त्यामुळे आम्ही खंडाळा तालुक्यातील सावित्रीबाईंच्या लेकी या कुचेष्टेचा धडा शिकविणार..