ताज्या घडामोडीनिवडणूकब्रेकिंग न्यूजराजकीयवाईसातारा जिल्हा

♦️अखेर वाई खंडाळा महाबळेश्वर महाविकास आघाडीचा उमेदवारी ठरली.. वाई तालुक्यातील बावधनचे अरूनादेवी पिसाळ यांचे नावावर शिक्कामोर्तब..


खंडाळा दि.28- अखेर वाई खंडाळा महाबळेश्र्वर मतदार संघाची उमेदवारी बावधनचे अरूनादेवी पिसाळ यांना शिक्कामोर्तब महाविकास आघाडीचा निर्णय; जोमाने कामाला लागा शरद पवार साहेबांचे आदेश..
       नुकतीच वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघाची उमेदवारी महाविकास आघाडीच्या वतीने आज अखेर गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती तर मा. शरद पवार साहेबांचा ग्रीन सिग्नल डॉ. सावंत यांच्या दिशेने असल्याने प्रसार माध्यमावर डॉ. नितीन सावंत यांना उमेदवारी जाहीर झाल्याचे प्रसारित करण्यात आले परंतु मुंबई येथे वाय सी एम या ठिकाणी आज दिवसभरात झालेल्या घडामोडीनंतर महाविकास आघाडीचे वतीने अरूनादेवी पिसाळ यांचे उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आले असून वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघातील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व महाविकास आघाडीतील मित्र पक्षांनी मतभेद न करता जोमाने कामाला लागा आणि महायुतीच्या उमेदवाराला दणका द्या असे आव्हाहन महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आले आहे.

🔺महाविकास आघाडीकडून खंडाळा तालुक्याला अखेर निराशा?

       दोन दिवसापासून महाविकास आघाडीच्या माध्यमातून खंडाळा तालुक्यातील डॉक्टर नितीन सावंत यांना उमेदवारी मिळाल्याचे व मिळणार असल्याचे प्रसारमाध्यमांवर पसरत असलेल्या बातमीमुळे खंडाळा तालुक्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून न्याय मिळणार असल्याचा आनंद जनतेने साजरा केला परंतु तालुक्याला उमेदवारी न मिळाल्याने अखेर त्यांचें पदरी निराशाच आली असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पहायला मिळत आहे.

🔺अरूनादेविची उमेदवारी जाहीर होतात आ.मकरंद पाटील गोटात खळबळ..

      महाविकास आघाडीच्या वतीने गेले दोन दिवसापासून उमेदवारी जाहीर होत नसल्याने तसेच अंतर्गत घडामोडीमुळे इतर उमेदवारांनी दिलेल्या बंडाच्या हाकेनंतर आमदार मकरंद पाटील यांच्या गोटात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु आता शरद पवार साहेबांनी अरुणादेवी पिसाळ यांना उमेदवारी देऊन वाई खंडाळा महाबळेश्वर मतदारसंघात त्यांचें मागे ज्येष्ठ नेते शरद पवार, खा. सुप्रिया सुळे, माजी खा. श्रीनिवास पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. रोहित पवार तसेच वाई विधानसभा मतदारसंघातील आ. मकरंद पाटलांच्या विरोधकांसह राष्ट्रवादीचे आजी-माजी पदाधिकारी व युवा कार्यकर्ते यांचे पाठबळ असणार आहे. त्यामुळे वाई तालुक्यातील बावधन या गावातील अरुणादेवी पिसाळ यांची उमेदवारी देऊन शरद पवार साहेबांनी आ. मकरंद पाटलांनवर डबल डाव टाकला असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आ. मकरंद पाटील यांना हि उमेदवारी सोपी नसुन अरुणादेवी पिसाळ यांच्या उमेदवारीमुळे आमदार मकरंद पाटील यांचे गोठात खळबळ उडाली असून आगामी काळात महायुती वर्सेस महाविकास आघाडी यांचा अटीतटीचा सामना पहावयास मिळणार आहे.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page