♦️अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला..एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला मतदान, तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी..
▲ खंडाळा दि.15 – येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होईल.
दीपावली पूर्वीच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तसेच ऐन दीपावली दरम्यान निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार असल्याने मतदारांची देखील दिवाळी गोड होण्याची चिन्ह आहे. २९ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सणाचा जल्लोष राहणार असल्याने याच दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तसेच मागे घेण्याची अखेरची तारीख असल्याने ऐन दिवाळीत आता निवडणुकीचा देखील माहोल रंगणार आहे. त्यातच राज्यभरात एकाच दिवशी निवडणूक होणार असल्याने राजकीय नेत्यांचे देखील निवडणूक प्रचारासाठी मोठी धावपळ उडताना दिसेल.
बातमी व जाहिरातीसाठी संपर्क – किरण मोरे.