♦️शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा अज्ञात ड्रोनच्या घिर्ट्या ?
▲ शिरवळ, खंडाळा ता.30 – शिरवळ लोणंदसह खंडाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात ड्रोन टेहळणी करीत असल्याचे धक्कादायक प्रकार मागे घडत असल्याचे पहायला मिळाला होता. मागे अतीट, गावडेवाडी, शिरवळ, धनगरवाडी, पिसाळवडी, भादे येथील गावात नागरिकांनी ड्रोन प्रत्यक्ष पाहिले होते. ड्रोनने रेकी करित असल्याचा संशय येथील नागरिकांना व्यक्त केला होता. आता पुन्हा त्याच धर्तीवर पुन्हा शिरवळ पोलीस स्टेशन हद्दित संशयित ड्रोन फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले असल्याचे सांगितले जात आहे.या अज्ञात ड्रोन सदृश्य असणारी वस्तूमुळे शिरवळसह पूर्ण खंडाळा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
आता देखील शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीतील पच्चीम भागात ड्रोन सदृश्य असणारी वस्तू रात्रीच्या वेळीं आकाशात फिरत असल्याचे नागरिकांच्या पाहण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत शिरवळ पोलिसांना माहिती सांगितली असता त्यांना देखील या प्रकारा बाबत अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे सांगण्यात आले. शिरवळ परिसरात देखील दोन दिवसापुर्वी ड्रोन सदृश्य असणारी वस्तू पाहिली असल्याचं प्रत्यक्ष दर्शी यांनी सांगितले आहे. त्यामुळे परिसरात पुन्हा नागरिकांचे भितीमय वातावरण झाले असून रात्री या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मात्र, नेमके हे ड्रोन सदृश्य असणारी वस्तू कोणाचे आहे? कशासाठी ते उडविले जात आहेत, की नक्की हे कोणत्या प्रकारचे रेकी तर करीत नाहीना याची ना पोलिसांना माहिती आहे, ना अद्याप जिल्ह्यातील इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अधिकच वाढले असून नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरवळ पोलिसांकडून या प्रकाराबाबत नागरिकांनी घाबरून न जाता अफवा पसरऊ नयेत तसेच सतर्क रहावे असे आवाहन शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांनी केले आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क- किरण मोरे