♦️लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) यांचेतर्फे मोफत मोदक प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..
▲ शिरवळ दि.6 – लोकजनशक्ती पार्टी (रामविलास) यांचे तर्फे तसेच महिलांच्या आग्रहास्तव तसेच गणेश उत्सवाच्या आगमनच्या शुभ मुहूर्तावर महिला आघाडी सातारा जिल्हाच्या वतीने मोफत मोदक प्रशिक्षणाचा कार्यक्रम कबुले हॉल शिरवळ याठिकाणी आयोजित करण्यात आला होता.
लो.ज.पा.चे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री चिरागजी पासवान साहेब यांचे विचारधारेने व महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष मा. शमीम भाई हवा यांच्या आदेशाने पश्चिम महाराष्ट्रात लोक जनशक्ती पार्टीचे काम हे घराघरात पोहोचवण्या करिता विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. त्यापैकीच महिला सशक्तिकरण साठी मोफत प्रशिक्षणाचा पहिला प्रयोग हा लोक जनशक्ती पार्टी सातारा जिल्हा महिला आघाडीचे वतीने यशस्वी पार पाडण्यात आला.सदर शिबिरामध्ये मोदकाचे असंख्य प्रकार बनवण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात आले.व्यवसायासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावे मालाची गुणवत्ता व जाहिरात कशी करावी याचे मार्गदर्शन सुद्धा करण्यात आले.
या कार्यक्रमात शेकडो महिलांनी या प्रशिक्षणाचा लाभ घेतला. सदर कार्यक्रमांमध्ये महिलां भगिनींना जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले. सर्व उपस्थित महिला भगिनींना भेटवस्तू देऊन सदर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत लेबर सेलचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष करणदादा गायकवाड खंडाळा तालुका अध्यक्ष अरुण गायकवाड युथ तालुका अध्यक्ष विनोद भिंगारे, जय इजगज यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाची संकल्पना व कार्यक्रम आयोजक समितीच्या प्रमुख सुनंदाताई येवले सातारा जिल्हा कार्याध्यक्ष प्रियंकाताई भोसले, तालुका अध्यक्ष वर्षाताई आठवले, कार्याध्यक्ष भाग्यश्री कांबळे, उपाध्यक्ष रोहिणी जाधव यांच्या प्रयत्नातून कार्यक्रम यशस्वी करण्यात आला.लवकरच पश्चिम महाराष्ट्रातील पुणे,कोल्हापूर,सोलापूर,सांगली, सातारा या जिल्ह्यामध्ये अन्नप्रक्रिया संबंधित विविध मोफत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून गणेश विसर्जनानंतर लोक जनशक्ती पार्टी सातारा जिल्ह्याच्या वतीने वतीने 1000 महिलांना अन्नप्रक्रिया शिबिरातून प्रशिक्षित करण्यात येणार असल्याचे जिल्हाध्यक्ष विजयराव गायकवाड यांनी कार्यक्रम प्रसंगी सांगितले.