क्राईमसातारा जिल्हा

♦️फसवणूक करीत ३० वेळा अर्ज केला २६ वेळा मिळविले पैसे..सरकारचे लाडके बहीण व दाजी पोलिसांच्या ताब्यात ?


सातारा दि.4 – राज्यांत सर्वत्र लाडकी बहीण योजनेचा मोठा बोलबाला आहे. काही ठिकाणी बहिणींनी अर्ज करून देखील त्यांचे खात्यात पैसे जमा झाले नाहीत असे असताना सातारच्या या बहिणीच्या खात्यात तब्बल 26 वेळा पैसे जमा झाल्याची बाब उघड झाली आहे.

साताऱ्यात एकाच बहिणीच्या नावे तब्बल 30 वेळा अर्ज दाखल करण्यात आल्याचे समोर आलं आहे. पोलीस तपासात ही धक्कादायक माहिती समोर आली असून या योजनेतील पैसे घेण्यासाठी महिलेने विविध पेहरावांत सेल्फी घेवुन फोटो अपलोड करीत अशा प्रकारे 29 अर्ज भरले असल्याचे समोर आले आहे.

त्यानंतर बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एस खाबडे यांनी वडूज पोलिसांनी निमसोड (ता. खटाव) येथे याबाबत फिर्याद दाखल केली असून गणेश संजय घाडगे (वय 30) प्रतीक्षा पोपट जाधव (वय २२) अशी या दाम्पत्याची नावे आहेत. लाडकी बहीण योजनेमध्ये गैर कारभार झाल्याची तक्रार पनवेल मधील भाजपचे माजी नगरसेवक निलेश बाविस्कर यांनी 2 सप्टेंबर रोजी पनवेल तहसीलदारांकडे तक्रार केली होती. खारघरमधील एका महिलेचे आधार कार्ड वापरून साताऱ्यात 30 अर्ज भरले असून यातील काही खात्यामध्ये पैसेही जमा झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने तातडीने समिती नेमून या प्रकरणाचा छडा लावला. यामध्ये प्रतीक्षा जाधव हिने विविध पेहरावांत सेल्फी घेवुन अधिकचा लाभ मिळवण्यासाठी बेबासाइटवर फोटो अपलोड केला आणि यात माणदेशी महिला सहकारी बँकेत सदर महिलेचे पैसे जमा झाले होते. या घटनेची माहिती मिळताच बाल विकास प्रकल्प अधिकारी एस.एस खाबडे यांनी वडूज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी या देघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. विक्रांत पाटील हे करीत आहेत.

• बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page