♦️ त्या दलाल वार्ताहराची 50 हजार रु. खंडणीची मागणी करीत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्ज दाखल; गुन्हा दाखल करण्यास पोलिसांची टाळाटाळ?
▲ शिरवळ दि.1 – एका वृत्तपत्रामध्ये वार्ताहर म्हणून काम करणाऱ्या तसेच शिरवळ येथील एका पतसंस्थेत मनमुरादपने व्हाइस चेअरमन पदावर असणाऱ्या व्यक्तीने इस्त्रीचा व्यवसाय करणाऱ्या एका व्यक्तीकडे खंडणीची मागणी केली असून, त्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी शिरवळ पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. तसेच तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीने तक्रार अर्जामध्ये संबधित वार्ताहर शिवीगाळ करीत जिवे मारण्याची व जेलमध्ये टाकण्याची धमकी देत असल्याचा गंभीर आरोप करीत गेल्या काही दिवसांपासून त्याच्या सततच्या जाचाला कंटाळून सामूहिक कुटुंबासमवेत आत्महत्या करण्याचे विचार मनात येत असल्याचे तक्रार अर्जात म्हटले आहे.
या प्रकरणामुळे शिरवळ परिसरात मोठी खळबळ उडाली असून, संबधित व्यक्तीवर खंडणी, ब्लॅक मेलिंग, जीवे मारण्यची धमकी देणे, आत्महत्येस प्रवृत्त करणे गुन्हा दाखल करुन अटक करण्याची मागणी तक्रारदार यांनी केली आहे.
• नेमकं प्रकरण काय?
एका महिन्या पूर्वी पर्यंत तक्रादार येथील एका पतसंस्थेत सचिव पदावर कार्यरत होते. परंतु, मागच्या सहा महिन्यापूर्वी पतसंस्थेची नवीन कार्यकारिणीची निवड झाली व नवीन कार्यकरणीत व्हाईसचेअरमन म्हणून या दलाल वार्ताहराची निवड करण्यात आली. त्याच्या जाचाला कंटाळून तक्रारदार यांनी सचिव पदाचा राजीनामा दिला आणि रोजी रोटी साठी पूर्ण वेळ इस्त्रीचा व्यवसाय सुरू केला. मात्र, तथाकथित वार्ताहर जेव्हापासून व्हाईस चेअरमन पदी कार्यरत झाले तेव्हापासून वेगवेगळ्या पद्धतीने तक्रारदारला धमकावून मानसिक त्रास देत आहे. “में तेरेको भ्रष्ट्राचार के झूठे केस मे अटकाके झेल भेज दुंगा, मेरा पोलीस स्टेशन मे बहुत वजन है, हर कोई मेरी सुनता है, सबकी रस्सी मेरे हाथमें है, तेरेपे जो बोलु वो कलम लगा सकता हू, तेरी झुटे आरोप लगाके कारनामे पेपर मे छाप के तेरी बदनामी कर दूंगा, मेरेको पचास हजार रु. दे वरणा तरेको जेल भेज दुंगा छे महिने जामीन नाही होगा, मैने अच्छे अच्छेको काम को लगाया है!” असे म्हणून “वारंवार पन्नास हजार रुपये खंडणीची मागणी करत आहे.” या गंभीर आरोपाच्या जाचाला कंटाळून तक्रारदार यांनी पतसंस्थेच्या सचिव पदाचा राजीनामा दिल्या असल्याचा तक्रारदाराचे म्हणणे आहे.
तक्रारदार यांना आपण सचिव पदाचा राजीनामा दिल्यानंतर तथाकथित वार्ताहराचा आपल्याला मानसिक त्रास कमी होईल असे वाटले. परंतु, राजीनामा दिल्यानंतर देखील हा प्रकार सुरूच राहिला. किंबहुना राजीनामा दिल्यानंतर त्रास कमी होण्याऐवजी वाढला, असे तक्रारदार यांने अर्जात नमूद केले आहे.
• जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा विचार: तक्रारदार
एवढेच नव्हे तर तक्रारदार यांच्या मुलीचे लग्न ठरले असून, तथाकथित वार्ताहर हा “तुझ्या मुलीचे लग्न होऊ देणार नाही, त्या आधी तुला जेलमध्ये पाठविलं” असे सांगून मुलीच्या लग्नात अडथळा निर्माण करीत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. त्याच्या मानसिक त्रासाला कंटाळून गेल्या तीन-चार दिवसांपासून तक्रारदार यांच्या मनात कुटुंबासमवेत सामूहिक आत्महत्येचे विचार येत आहे. परंतु तक्रार दाराच्या पत्नीने वारंवार समजावून सांगितल्यामूळे आत्महत्या करण्यापासून परावृत झाले. तरी या प्रकरणाची चौकशी करुन तथाकथित वार्ताहरला याच्या विरुद्ध खंडणीचा, जीवे मारण्याच्या धमकीचा, आत्महत्येस प्रवृत करण्याचा, तसेच शिवीगाळ करून ब्लॅकमेल केलेबाबत गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी तक्रारदार यांनी अर्जात केली आहे.
• पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ ?
तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, शिरवळ पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारदार गेले असता, शिरवळ पोलीस कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम केले जात आहे. तक्रार न घेता वारंवार अर्ज देण्यासाठी सांगितले जात होते. तसेच “आम्ही चौकशी करुन यावर निर्णय देऊ” असे तक्रारदाराला पोलिसांकडून सांगण्यात येत असल्याचे तक्रारदाराचे म्हणने आहे. अखेर तक्रारदार यांनी तक्रार अर्ज दाखल केला. परंतु पोलीस यावर पडदा टाकत ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे, अश्या दलाल वार्तहारास पाठीशी घालण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप तक्रारदार यांनी केला आहे. सदर प्रकरणी तक्रारदार सातारा पोलीस अधिक्षक समीर शेख यांचेकडे न्यायाची मागनी करणार असल्याचे सांगितले असून सातारा पोलीस अधीक्षक यात लक्ष घालून काय भूमिका घेणार हे पहाणे महत्वाचे ठारणार आहे.
• बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123