♦️ मुसळधार पावसाने रस्त्यांची अवस्था बिकट;खड्डे भरण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू..
▲ खेडशिवापुर दि.३० – दरवर्षीच्या प्रमाणात यावर्षी मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने राष्ट्रीय महामार्गाच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे अवजड वाहने ये जा करीत असल्याने रस्त्यांना भले मोठे खड्डे पडले आहेत. याला पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग अपवाद नसून प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी खड्डे भरण्याचे काम दिवसरात्र युद्धपातळीवर सुरु आहे.
त्यामुळे भर पावसात देखील रस्ता दुरुस्तीचे काम चालू असून पाऊस उघडल्यावर हॉटमिक्स तसेच भरपावसात कोल्डमिक्सने खड्डे भरले जात आहेत. परंतु काही ठिकाणी वारंवार खड्डे पडत असल्याने या पार्श्वभूमीवर जिओपॉलिमर काँक्रीट या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून पुणे सातारा राष्ट्रीय महामार्ग यांचे वतीने प्रवाशांच्या सेवेसाठी आज पासून खड्डे भरण्याचे काम सुरु झाले आहे.
पहिल्या टप्प्यात जे खड्डे पुन्हा पुन्हा उघडे होत आहेत ते या नवीन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून भरले जातील आणि त्यानंतर उर्वरित काम केले जाईल असे महामार्ग प्राधिकरणाच्या वतीने सांगण्यात आले आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मुंबई गोवा हाईवे वरती मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून पुणे सातारा महामार्गावर कामथडी व धांगवडी फाटा येथे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण याच्या कडून करत आहे. या नवीन तंत्रज्ञानाचा वापर मुंबई महानगरपालिका यांचे माध्यमातून सुद्धा केला जात आहे.