♦️ महिलांना न्याय सुरक्षा मिळण्यासाठी शिरवळ मधील महिला रस्त्यावर..
▲ शिरवळ दि.24 – बदलापूर येथील घटना व राज्यात घडत असलेल्या महिलांवरील अत्याचारांच्या घटनेवर नुकत्याच घडलेल्या अनेक घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. सामाजिक माध्यमांवर या घटनांविषयी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. नागरिकांना वाटते की महिला आजच्या समाजात असुरक्षित झाल्या आहेत.
याच संदर्भात शिरवळ मधील महीलांच्या वतीने वाढत्या महीला अत्याचाराचा विरोधात एकत्र येऊन पुर्ण गावातून रॕली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौकात महीला सुरक्षेसाठी आंदोलन केले. व पोलीस स्टेशनमध्ये जावून महीलांना सुरक्षा मिळावी शिरवळ पोलीस स्टेशन येथे निवेदन दिले. या सर्व महीला कुठल्याही संघटना किंवा राजकीय पक्षांशी संबंधित नसून फक्त महीलांना न्याय सुरक्षा मिळावी यासाठी स्व:ता स्वयंप्रेरणेने बाहेर पडल्या होत्या. यावेळी सौ. उज्वला तांबे, अंबिका देशमाने, उज्वला साठे, शैला जावळे, दिपाली जगताप, छाया अडसूळ, अलका नेवसे, अंबिका पवार, माधुरी मांढरे, शैला सोनवणे सीमा तावडे, विद्या निवळकर, पूजा जगताप, संगीता सिंग, पार्वती बिराजदार, अनिता माने, आशा कुरलेकर, श्रद्धा वाघ, आशा पवार, ज्योती तायडे, सरोजा राऊत आदी महिला उपस्थित होत्या.