♦️ शिरवळ ग्रामसभेत पीडित महिलेची वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न? घटनेचा ७ वा दिवस पोलीस प्रशासनाची चुप्पी.. वरद हस्त नक्की कोणाचा?
▲ शिरवळ दि.22 – शिरवळ हे जिल्ह्यातील सर्वाधिक लोकसंख्या तसेच मोठी ग्रामपंचायत असलेले गाव म्हणून समजले जाते. या गावची ग्रामसभा हि खेळी मिलीच्या वातावरणात चालू होती. यामध्ये ग्रामसभा चालू असताना शिरवळ मधील विनयभंग व ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपी आनंद फडके, मुराद पटेल यांनी ग्रामसभा हातात घेत विनाकारण ग्रामसभेची कोणताही संबंध नसताना पीडित कुटुंबाचे वाभाडे काढीत चिथावणीखोर वक्तव्य करण्यास सुरवात केली हा प्रयत्न करणे देखील गंभीर गुण्यात मोडत असून पोलीस प्रशासन या गंभीर प्रकरणावर गप्पच.
या दरम्यान या चिथावणी खोर वक्तव्य पहता पीडितेच्या पती यांनी याचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यास सुरवात केली त्याचे गावातील काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी हे शूटिंग बंद करण्यास सांगितले. “पीडितेचे पती हे उपस्थित ग्रामसभेतील लोकांना सांगत होते की शूटिंग करणे हा माझा संविधानिक अधिकार आहे. माझ्या अधिकारांवर कोणी गदा आणू शकत नाही.” तरी देखील उपस्थितानी जबरदस्ती करीत कायदा हातात घेत व्हिडिओ शूटिंग जबरदस्ती बंद केले.
या व्हिडिओ शूटिंग बंद केलेनंतर एकच गदारोळ झाला तर पोलीसानी या पीडित कुटुंबाला संरक्षण देत सुरक्षा कवच तयार केले. या दरम्यान आरोपीच्या कुटुंबातील महिला आशा फडके, सविता फडके यांनी भर ग्रामसभेत सर्व नागरीका समक्ष या पीडित महिलेचे मारहाण, वस्त्रहरण व शिवीगाळ करण्याचा प्रयत्न केला. याबाबत पीडित महिलेने पोलीस प्रशासनाकडे तक्रार देण्यासाठी धाव घेत गेली असता पोलिसांनी तक्रार न घेता अर्ज देण्यास सांगितल्याने पिडीतेने घडल्या प्रकरणाचा तक्रार अर्ज दिला.
या घटनेला आज सातवां दिवस असून देखील पोलीस प्रशासनाकडून आज अखेर पीडित महिलेला न्याय मिळालेला नाही. आज अखेर ना या प्रकरणावर गुन्हा दाखल, ना विनयभंग व ॲट्रॉसिटी गुन्ह्यातील आरोपींना अटक. आरोपी हे एका सत्तेतील राजकीय पक्षाचा कार्यकर्ता असलेने या प्रकरणात कोणाचा दबाव तर नाहीना अशी चर्चा नागरिकांमध्ये चालू आहे. या प्रकरणात वरद हस्त नक्की कोणाचा आहे? सातारा जिल्ह्यातील पालकमंत्री आरोपींना पाठीशी घालत तर नाहीना? राजकीय वरद हस्ता मुळे पोलीस प्रशासनाची चुप्पी तर नाहीना अशी चर्चा नागरिकांमधून रंगली आहे.
“ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली, ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे, कारण इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीेन..
असे त्याकाळी लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी म्हंटले होते आज त्याचीच आर्त हाक या पीडित महिलेची येत असून आम्हाला न्याय न मिळाल्यास आम्ही आमचे संपूर्ण कुटुंब भविष्य काळात देहत्याग करू असे पीडित महिलेने प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. त्यामुळे आता पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेणार याकडे पीडित महिलेसह नागरिकांचे लक्ष लागले आहे.