♦️वीर धरणामधून नीरा नदी पात्रात पाण्याचा विसर्ग झाला कमी..
▲खंडाळा दि. २६ (किरण मोरे)- नीरा देवघर, भाटघर व गुंजवणी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी झाला असल्याने वीर धरणामधून आज दि २६ रोजी सकाळी ६ वाजता ४ हजार ६३७ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.
नीरा खोऱ्यातील मागील २४ तासात चार धरणांमध्ये झालेला एकूण पाऊस व धरणांची टक्केवारी पुढीलप्रमाणे भाटघर ५९ मिमी एकूण ५१७ मिमी धरण ७३.५८% नीरा देवघर १७४ मिमी एकूण ११९४ पाणीसाठा ७३.१४% वीर ३४मिमी एकूण २३९ पाणीसाठा ९२. ८४% गुंजवणी ७५ एकूण १३६४ मिमी पाणीसाठा ७०.०५% मागील २४ तासात चार धरणात ७ टी एम सी ने पाणीसाठा वाढला आहे चारही धरणांचा एकूण पाणीसाठा ३७.१९२ टी एम सी झाला असून धरणे ७६.९५% भरली आहेत.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123