♦️अतिट ते कान्हवडी गावचे खिंडीत कोसळली दरड..
▲ अतिट,खंडाळा दि. २१ – (प्रतिनिधी – संदेश चव्हाण) खंडाळा तालुक्यातील अतिट ते कान्हवडी गावचे हद्दीत जाणे येनेच्या खिंडीत दुपारी ३.०० सुमारास जोरदार झालेल्या पावसाने दरड कोसळली याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की..
खंडाळा तालुक्यातील अतिट गावावरून कान्हवडी दिशेने जाणाऱ्या खिंडीत अंदाजे दुपारी ३.०० वाजनेचे सुमारास दिवसभर होत असलेल्या जोरदार पावसाने भली मोठी दरड कोसळून रस्त्यावर आली. त्यानंतर अतिट ते कान्हवडी अशी होत असलेली वाहतूक बंद झाली होती. याबाबतची माहिती प्रत्यक्ष दर्शी संतोष राऊत यांनी गावातील सरपंच रुपाली जाधव व उपसरपंच गणेश मांढरे यांना सांगितली. सरपंच उपसरपंच यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर हि बंद झालेली वाहतूक प्रथमेश जाधव यांचे जेसीबी व स्थानिक नागरिकांच्या सहाय्याने खुली करण्यात आली. परंतु या मार्गाने येने जाणेची वाहतूक धोकादायक झालेली असून. नागरिकांनी या खिंडीतून जाता येताना सावधानता बाळगावी असे आवाहन अतिट गावचे सरपंच रुपाली जाधव यांनी नागरिकांना केले आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123