♦️गुरूपौर्णिमे निमित्त विचारांच्या वारसदारांनी केले नायगाव येथे फुले दांपत्यांना अभिवादन…
▲ नायगाव, दि. २१- आज दि. २१ आषाढ शुद्ध पौर्णिमा. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा म्हणून संबोधतात. भारतीय संस्कृतीमध्ये गुरुपौर्णिमेचे महत्त्व गुरु आणि शिष्य यांच्या पवित्र नात्याचे प्रतीक आहे. या दिवशी शिष्य आपल्या गुरूबद्दल आणि त्यांच्या ज्ञान व मार्गदर्शनाची कृतज्ञता व्यक्त करत असतात. गुरुपौर्णिमा ही गुरूची पौर्णिमा मानली जाते. पौर्णिमा म्हणजे प्रकाश. गुरु शिष्याला ज्ञान देतात, तो ज्ञानाचा प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचवला म्हणून गुरूची प्रार्थना करावयाचा व गुरुपुजनाचा तो हा दिवस.
“गुरु शिवाय ज्ञान नाही; ज्ञाना शिवाय आत्मा नाही, ध्यान, ज्ञान, धैर्य आणि कर्म; हि सर्व गुरुची देन..!”
सामाजिक सुधारणा, भारतीय स्वातंत्र्य तसेच मानवी जीवनाच्या विकासासाठी थोर महापुरुष यांचे मोलाचे योगदान आहे. महापुरुषांना गुरुस्थानी मानून अनेक मानवी मनाने समाज प्रगती करिता आपले आयुष्य समर्पित केले आहे.
“जाती, धर्म, पंथ मानवा नसावे; सत्याने वर्तावे ईशासाठी..” – क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले.
“विद्येविना मती गेली। मतिविना नीती गेली।नीतिविना गती गेली। गतिविना वित्त गेले। वित्ताविना शूद्र खचले। एवढे अनर्थ एका अविद्येने केले..।” – क्रांतीसुर्य महात्मा फुले.
सामाजिक क्रांतीचे जनक व आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले या थोर दांपत्यांनच्या संघर्षामुळे आज आपली पिढी शिकली व विचार करायला लागली. तसेच यांनी सामाज परिवर्तनाचे केलेले कार्य तसेच मुलींसाठी केलेला शैक्षणिक कार्याचा शुभारंभ यातून घडलेल्या नव समाजाने फुले दांपत्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेच्या दिवशी नायगाव येथे फुले दांपत्यांना विनम्र अभिवादन केले.
याप्रसंगी सुजन फाउंडेशनच्या वतीने प्रकाशित पुण्यश्लोक काव्यसंग्रह नायगाव ग्रंथालयास मा.अजित जाधव यांनी सुपूर्द केला. या कार्यक्रम प्रसंगी भागातील फुले दापत्य प्रेमी बंधु-भगिनीं आदी या पवित्र स्थळी अभिवादनासाठी नतमस्तक झाले.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123