♦️भर बाजार पेठेत मोटार सायकली सुसाट; शिरवळ करांचा जीव टांगणीला.?
▲ शिरवळ, दि. 19 – शिरवळ- खंडाळा तालुक्यात व पंचक्रोशीत मोठी बाजारपेठ असलेले गाव म्हणून ओळखले जाते. नुकत्याच काही दिवसांपूर्वी शिरवळ मधील ग्रामपंचायत शिरवळ यांनी लोकांच्या आग्रहास्तव अनधिकृत स्पीड ब्रेकर काढून मेन बाजार पेठ, शाळा व आवश्यक ठिकाणी नवीन अद्यावत स्पीड ब्रेकर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला.
त्यानुसार शिरवळ ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच रविराज दुधगावकर यांनी मीटिंग मध्ये घेतलेला निर्णय आमलात आणत अनधिकृत स्पीड ब्रेकर तत्परतेने काढून टाकले. त्यामुळे शिरवळ मधील नागरिकांनी बरेच दिवसांपासून प्रलंबित असणारा व लोकांची मागणी असणारा प्रश्न मार्गी लागल्याचा आनंद झाला व शिरवळ गावातील अनधिकृत स्पीड ब्रेकर काढल्याने गावातील मणक्याचे आजार असणाऱ्यांनी सुस्कारा सोडला.
मात्र आता शिरवळ मध्ये बाजारपेठ ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी अद्याप एकही नवीन स्पीड ब्रेकर न टाकल्याने शिरवळ मधील हुल्लडबाज तरुणांच्या मोटार सायकली सुसाट फिरायला लागल्या आहेत. त्यामुळे शिरवळ मधील सर्वसामान्य नागरिक व शालेय मुलांचा जीव टांगणीला आला आहे. त्यांना या रोडणे जाताना आपला जीव मुठीत घेऊन जावे लागत आहे. भविष्यात यामुळे सुसाट मोटार सायकलीमुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्यामुळे सद्य स्थितीत शिरवळ ग्रामपंचायतला नवीन स्पीड ब्रेकर टाकण्याच्या निर्णयाचा विसर पडला असल्याचे दिसून येत असून, शिरवळ ग्रामपंचायत अद्यावत स्पीड ब्रेकर टाकण्याचा निर्णयावर भूमिका घेणार की एखादा अपघात झालेवर या प्रशासनाला जाग येणार याकडे शिरवळ मधील नागरिकांचे लक्ष लागुन राहिले आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123