♦️सातारा येथे छत्रपती शिवरायांच्या वाघणाखांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उपस्थितीत प्रदर्शनाचे उद्घाटन..
▲सातारा दि.19 – छत्रपती शिवरायांनी वाघनखांच्या सहाय्याने अफजलखानचा कोथळा बाहेर काढून मराठेशाहीचा भगवा किल्ले प्रतापगडावर डौलाने फडकत ठेवला. ह्या पराक्रमाचे प्रतीक असलेली वाघनखे काल दुपारी साताऱ्यात विशेष सुरक्षेत दाखल झाली त्याचे आज छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
हि वाघनखे पुढील सात महिने लोकांना पाहण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत. त्याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते करण्यात आले यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री शंभूराज देसाई, खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, आमदार जयकुमार गोरे आदि प्रमुख नेते उपस्थित होते.
• नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघ नखाचे महत्व काय कळणार ?: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
• त्यांचे नेतेही नकली आणि त्यांचे मंत्रीही नकली.! : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रसार माध्यमांशी बोलताना “नकली वाघांना शिवरायांच्या खऱ्या वाघनखाचे महत्व काय कळणार” तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे नेतेही नकली आणि त्यांचे मंत्रीही नकली असा टोला विरोधकांना लगावला.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123