♦️भोर येथे एसटी बसस्थानकात एकाचा चाकाखाली येऊन तरुणाचा मृत्यू..
▲ भोर, पुणे दि.15 – भोर येथे एसटी बसस्थानकात एका युवकाचा एसटी बस खाली येऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली असून घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की..
भोर बसस्थानकात एसटी बस हि पुढे जात असताना एसटी बसने ठोकर देऊन एसटी बसचे चाक एका युवकाचा डोक्यावर जाऊन त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्या मृत तरुणाची माहिती घेतली असता तो युवक रुपेश गायकवाड असे असून त्याचा जवळ झाडा झडती घेतली असता तो पोलादपूर येथील राहणार असल्याचे प्राथमिक माहिती मधून पुढे आले आहे.
भोर पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून युवकाचा मृतदेह भोर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला असून गुन्हा दाखल करणेचे प्रोसेस चालू आहे. पुढील तपास भोर पोलीस करीत आहेत. संबधित तरुण कोणाच्या परिचयाचा असलेस तात्काळ भोर पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन भोर पोलिसांकडून करण्यात आले आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123