खंडाळाताज्या घडामोडीसातारा जिल्हा

♦️ खंबाटकी घाटात वाहतूक धीम्या गतीने.


खंडाळा दि.13 – खंडाळा येथून सातारा दिशेने जाणारी वाहतूक धिम्या गतीने सुरू असून आज पहाटे 6 वाजनेचे सुमारास एक अज्ञात ट्रकचे ऑईल घाटाच्या सुरवातीलाच रस्त्यात सांडल्याने वाहतूक विस्कळित झाली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की

          आज पहाटे खंडाळा खंबाटकी घाटात पहाटे 6 वाजनेचे सुमारास एका अज्ञात ट्रकचे ऑईल घाटाच्या सुरुवातीला रस्त्याच्या मध्येच सांडलेने सातारा दिशेने जाणारे वाहनांचे किरकोळ अपघात झाले असून हि बातमी भुईंज महामार्ग पोलीस व खंडाळा पोलीस यांना माहिती समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

         पोलिसांनी पाहणी केली व मोठा अपघात होऊ नये यासाठी तात्काळ ब्यारिगेट करून व अग्नीशमन बंब बोलू रस्ता पाण्याच्या फोर्सने धुण्याचा प्रयत्न केला परंतु ऑईल जास्त पडलेने निघू शकले नाही. त्यांनतर भुईंज महामार्ग पोलीस व खंडाळा पोलीस यांचे अथक प्रयत्नाने ऑईल सांडलेल्या भागात माती टाकून वाहतूक ऐका लेनने सुरू करण्यात आली.

         महामार्ग पोलीस व खंडाळा पोलीस यांच्या समय सूचकतेने मोठी हानी टळली आहे.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page