सातारा जिल्हा

♦️मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर…


सातारा दि.10-  सरकारने मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी योजना हि संपूर्ण तळागाळातील महिलांना याचा लाभ मिळावा यासाठी काढण्यात आली. त्यातचं योजना सुरू केले नंतर राज्यभरातील महिलांनी तहसील कार्यालय तसेच अन्य कार्यालयावर एकच गर्दी केली होती. त्यानंतर त्यात शासनाने अंशतः बदल करून त्यातील काही कागद पत्रे शिथिल केली. परंतु महिलांना होणारा अधिकचा ताण कमी करण्यासाठी सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी शासनाचे पथक आपल्या दारी हि मोहीम आखली आहे.

          सध्या पेरणीचे दिवस असल्याने दिवसभर महिला शेतीच्या कामात व्यस्त असल्याने या महिलांना या योजनेचा लाभ मिळावा व शेतात काभाड – कष्ट करणाऱ्या महिला या योजनेपासून वंचित राहू नये यासाठी थेट बांधावर जाऊन “मुख्यमंत्री बहीण माझी लाडकी” या योजनेची माहिती देताना सातारा जिल्ह्यातील शिंगणवाडी येथील अंगणवाडी सेविका दिसत आहेत.

        सातारा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी राबविलेल्या शासनाचे पथक आपल्या दारी या मोहिमेचे संपूर्ण सातारा जिल्यातील महिलांकडून स्वागत केले जात आहे.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page