♦️शिरवळ पोलीस स्टेशन हद्दित १५ वर्षीय मुलीची छेड.?
♦️पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल तर..आरोपी पोलिसांच्या ताब्यात..
▲ शिरवळ, सातारा दि.४ – शिरवळ पोलीस स्टेशन हद्दिमध्ये १५ वर्षीय अल्पवयीन मुलींची छेड काढले प्रकरणी शिरवळ पोलीस स्टेशन येथे दि. ०४/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी की..
इ. १० वीच्या वर्गात शिकत असलेल्या १५ वर्षीय पीडित मुलगी व तिची मैत्रीण असे कोचिंग क्लासेस साठी सायंकाळी ६.३० चे सुमारास शिरवळ येथे कोचिंग क्लासेसचे ठिकाणी पोहचले असता. त्या ठिकाणी काळसर रंगाची केटीएम मोटारसायकल शेजारी उभे असलेले मंगेश पांडुरंग येंधे वय – २४ वर्षे रा. शिंदेवाडी व निमित बाळकृष्ण साळुंखे वय-२२ राहणार – पसरणी, वाई असे दोघेजन फिर्यादी पीडित मुलगी व तिची मैत्रीण हिच्याकडे बघून हसत होते. त्यानंतर सदर घडला प्रकार पिडीताने कोचींग क्लासेसचे शिक्षकांना सांगितला व असाच काहीसा प्रकार काल दि. ३/०७/२०२४ रोजी मंगेश येंधे व निमित साळुंखे यांनी करून काल पीडितांचा कोचींग क्लास सुठलेवर त्यांनी मोटार सायकल वरून शिरवळ बस स्टँड पर्यंत पीडितांचा पाठलाग केला असल्याचे सांगितले.
त्याबाबत कोचींग क्लासचे शिक्षक यांनी बाहेर आले असता त्यावेळी पीडित मुलींची आई देखील कालचा घडलेला प्रकार पीडित मुलीने आईला सांगितलेने त्याही पाठीमागून क्लासचे ठिकाणी आले होते. त्यावेळी मंगेश येंधे व निमित साळुंखे हे मोटारसायकल लगत उभी असल्याने शिक्षक व पीडितांची आई ह्यांनी त्या दोघांना पाठलाग का करीत आहे याबाबत विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे दिली. गावातील येणाऱ्या जाणाऱ्या लोकांनी या दोघांना पकडुन पोलिसांना घडला प्रकार समजताच घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ घटनास्थळी येउन त्यांना लोकांनी नावे विचारली असता मंगेश पांडुरंग येंधे वय- २४ वर्षे रा. शिंदेवाडी व निमित बाळकृष्ण साळुंखे वय-२२ अशी नावे सांगितली. त्यांना शिरवळ पोलिसांनी ताब्यात घेतले असून याबाबत पिडीताने स्वतः घडले प्रकाराची माहिती देऊन त्याबाबत शिरवळ पोलीस येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नैना कामथे मॅडम करीत आहेत.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123