♦️ निंबुत गोळीबार प्रकरणी आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाही करण्याचे निर्देश…
♦️ श्रीमती अंकिता निंबाळकर यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून पाच लाखांची आर्थिक मदत..
▲ फलटण, सातारा दि.३ – पुणे जिल्ह्यातील निंबुत येथे बैलगाडा शर्यतीत सहभागी होणाऱ्या ‘सुंदर’ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या वादातून हत्या झालेले बैलगाडा मालक रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी श्रीमती अंकिता निंबाळकर यांना काल मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून विशेष बाब म्हणून पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
या ‘सुंदर’ नावाच्या बैलाच्या खरेदी विक्रीच्या प्रकरणातून घडलेल्या हत्या प्रकरणातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी गौतम काकडे याला देखील अटक करून या सर्व आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले असल्याचे याप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
तसेच निंबाळकर यांच्या उर्वरित कुटूंबाचा भवितव्याचा विचार करून ही मदत त्यांना देण्याचा निर्णय घेतला असून आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत या मदतीचा धनादेश निंबाळकर यांच्या पत्नीकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123