♦️ लोणंद, तरडगाव, फलटण पालखी तळाची जिल्हाअधिकारी यांचेकडून पहाणी..
▲ लोणंद,सातारा दि.१ – संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा आळंदी वरून प्रस्थान करून पंढरपूर कडे निघाला आहे. दिनांक ६ जुलै रोजी नीरा येथे दत्त घाटावर पालखी सोहळ्याचे सातारा जिल्ह्यात स्वागत करण्यात येणार आहे याची संपूर्ण तयारी प्रशासन करत असून जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी लोणंद, तरडगाव, काळज, सुरवडी, निंभोरे, फलटण पालखी तळाची पहाणी केली यावेळी सातारा जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, वाई प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, खंडाळा तहसिलदार अजित पाटील, फलटणचे प्रांताधिकारी सचिन ढोले, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस, तहसिलदार अभिजीत जाधव, फलटण पालिकेचे मुख्याधिकारी निखिल मोरे फलटण गटविकास अधिकारी चंद्रकांत बोडरे आदींची उपस्थिती होती
आगामी पालखी सोहळ्याची तयारीचा आढावा आम्ही घेतला असून लोणंद, तरडगाव सह फलटण आणि मधील सर्व पालखी विसावा स्थळांची सर्व विभागांची तयारी पूर्ण झाली असून पालखी काळातील स्वच्छता व पालखी नंतरची स्वच्छता यावर आम्ही भर दिला आहे. वारकऱ्यांसाठी मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी व वापरायचे पाणी आम्ही उपलब्ध करून देऊ आरोग्य सेवांमध्ये सर्व प्रकारची औषधे व आरोग्य पथके तयार ठेवली आहेत प्रत्येक विसावा स्थळाजवळ अशी पथके काम करतील सेवा रस्त्यांची दुरुस्ती व डांबरीकरण पूर्ण झाले असून आम्ही पालखीच्या स्वागतासाठी तयार आहोत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा तयारीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे जिल्हाधिकारी यांनी विविध ठिकाणची पहाणी केली यावेळी ते बोलत होते.
या वेळी पोलिस प्रशासनाने जय्यत तयारी केली असून कडक पोलीस बंदोबस्त पालखी काळात राहणार असून पोलिसांचे विशेष पथक गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी असणार आहे प्रत्येक ठिकाणाचा नकाशा पोलिस व पालिका अधिकाऱ्यांनी समन्वयातून तयार केले असून सूक्ष्म नियोजन करणेत आले असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस यांनी सांगितले
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – 9011555123