क्राईमताज्या घडामोडीसातारा जिल्हा

♦️ शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत दरोड्याचा प्रयत्न…पोलिसांच्या सतर्कतेने दरोडा अयशस्वी…


शिरवळ दि. २७ – शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत शिरवळ नजिक असणाऱ्या पुणे-बेंगळुरू हायवेलगत रामेश्वर ऍटो गॅरेज जवळ पहाटे दरोडा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना शिरवळ पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरोड्याच्या प्रयत्न अयशस्वी झाला असून शिरवळ पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून स्विफ्ट कारसह 3 लाख 51 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

          शिरवळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी पहाटे ३.३० वाजता, शिरवळ पोलीस हवालदार नितिन नलवडे आणि त्यांच्या टीमने शिरवळ-बेंगळुरू हायवेवर रामेश्वर ऑटो गॅरेजजवळ संशयास्पद हालचाली करणाऱ्या काही व्यक्तींना पाहिले असता पोलिसांनी ताबडतोब त्यांना रोखून चौकशी केली असता, त्यांच्याकडून काहीही उडवाउडवीची उत्तर मिळालेने. त्यांना पंचांच्या उपस्थितीत त्यांची झडती घेतली असता, त्यांच्याकडून लोखंडी कटर, कटावणी, मिरची पूड मिळून आले. 

          अधिक चौकशी केली असता हे सर्व जण दरोड्याचा प्रयत्न करण्यासाठी जमले होते असे उघड झाले. त्यानुसार, आरोपी तौसीब दस्तगीर बागवान, कृष्णात प्रकाश पोतेकर, आकाश अंकुश घाडगे, विक्रम दिपक सोनवले आणि सुरज महादेव पाटील यांना पोलीस हवालदार नितिन नलवडे यांच्या फिर्यादीनुसार अटक केली. त्यांच्याकडून वाहनासह 3 लाख 51 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलीसांनी अटक केलेल्या आरोपींवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३९९ आणि ४०२ अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शंकर पांगारे हे  करीत आहेत.

        सदर कामगिरी पोलिस निरीक्षक संदीप जगताप यांच्या यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ह नितीन नलावडे, पो.ह गिरीश भोईटे, पो कॉ. सूरज चव्हाण, संग्राम भोईटे, पो.ना चालक शिंदे, होमगार्ड ननावरे, येले यांनी केली असून आज आरोपींना नायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – किरण मोरे 9011555123


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page