♦️ड्रोन चोरीवर मात करण्यासाठी फलटण पोलीसांची शक्कल; ड्रोनच घेणार ड्रोनचा शोध..
▲शिरवळ ता. 15 – शिरवळ परिसरात मध्ये गेले काही दिवसांपासून सायंकाळी अंदाजे १० ते १२ वाजनेचे सुमारास ड्रोनद्वारे टेहळणी होत असल्याचे प्रकार घडत असून अश्याच पद्धतीने फलटण तालुक्यात सुद्धा ड्रोनद्वारे टेहळणी करून चोरी झाल्याचे प्रकार उघडकीस आला आहे.
फलटण तालुक्याच्या विविध भागांमध्ये ड्रोनच्या सहाय्याने चोरी करण्याचा प्रयत्न चोरटे करत असल्याचे निदर्शनास आले असल्याने व काळानुसार चोरटे सुद्धा हायटेक पद्धतीने चोरी करीत असल्याचे दिसून येत आहे. फलटण तालुक्याच्या विविध भागांमध्ये ड्रोनद्वारे चोरी करण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे आता फलटण पोलिसांनी सुद्धा अनोखी शक्कल लढवली असून ड्रोनद्वारे चोरी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणार आहे.
यासाठी आता फलटण पोलीस प्रशासनाकडे देखील शासकीय ड्रोन कॅमेरा दाखल झाला आहे. यामुळे ज्या भागामध्ये ड्रोन द्वारे चोरीसाठी टेहळणी केली जात आहे व चोरीचे प्रकार घडत आहेत त्या भागामध्ये आता पोलीस सुद्धा ड्रोनद्वारे ड्रोनद्या शोध घेऊन त्यामागे असणाऱ्या चोरट्यांचा शोध घेतला जाणार आहे. तरी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक सुनील महाडिक हे शासकीय ड्रोन घेऊन अनोख्या पद्धतीने चोरी करण्याऱ्या चोरांसाठी कंबर कसून तयार आहेत. शहरातील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येत आहे कि जर कुठे ड्रोन दिसल्याचे कळल्यास तात्काळ फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनची संपर्क करावा; असे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांनी केले आहे.
शिरवळ भागातही असेच प्रकारचे संशयित ड्रोन फिरत असून भविष्यात होणारे चोरीसारखे प्रकार रोखण्यासाठी याबाबत शिरवळ पोलीस प्रशासनाने यावर लवकरात लवकर शहानिशा करून नक्की हा प्रकार काय आहे यासाठी पाऊले उचलावीत असा नागरिकांमधून सुर येत आहे.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क – किरण मोरे 9011555123