क्राईमताज्या घडामोडीसातारा जिल्हा

♦️शिरवळ पोलीस स्टेशन हद्दीत संशयित ड्रोनची टेहळणी?


शिरवळ ता.६ –शिरवळ लोणंदसह खंडाळा तालुक्याच्या ग्रामीण भागात ड्रोन टेहळणी करीत असल्याचे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अतीट, गावडेवाडी, शिरवळ, धनगरवाडी, पिसाळवडी, भादे येथील गावात नागरिकांनी ड्रोन प्रत्यक्ष पाहिले आहेत. ड्रोनने रेकी करित असल्याचा संशय येथील नागरिकांना आहे. त्यामुळे शिरवळसह पूर्व खंडाळा तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

          अतीट येथील पोलिस पाटील यांना अतीट परिसरात  भागात 3 ड्रोन फिरताना दिसून आले. तर काही नागरिकांनी ड्रोनचे मोबाईल मध्ये चित्रीकरण केले आहे. तर पिसाळ वाडी मध्ये एक ड्रोन जवळून गेल्याचे पाहिले आहे. या बाबत शिरवळ पोलिसांना माहिती सांगितली असता त्यांना देखील या प्रकारा बाबत कोणतीहीमाहिती नसल्याचे सांगण्यात आले. धनगरवाडी – पिसाळवडी परिसरातही मागील दोन दिवसांपासून अज्ञात ड्रोन दररोज रात्री उडताना दिसत आहे. त्यामुळे रात्री या परिसरात पोलिसांनी गस्त घालावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

          अतीट, गावडेवाडी, शिरवळ, धनगरवाडी, पिसाळवडी, भादे, लोणी, भादे, मोर्वे गावात व परिसरात रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास अज्ञात दोन ड्रोन फिरताना नागरिकांनी पाहिले आहे. तर काही नागरिकांनी फिरत असलेल्या ड्रोनचे व्हिडीओ चित्रीकरणच केले आहे. लाल, हिरव्या रंगाच्या छोट्या छोट्या लाईटस या ड्रोनमध्ये आहेत. काही वेळानंतर हा ड्रोन गायब झाले असल्याचे पहायला मिळाले.

            मात्र, नेमके हे ड्रोन कोणाचे आहे? कशासाठी ते उडविले जात आहेत, की नक्की हे कोणत्या प्रकारचे रेकी तर करीत नाहीना याची ना पोलिसांना माहिती आहे, ना जिल्ह्यातील इतर कोणत्याही प्रशासकीय यंत्रणेला, त्यामुळे या मागील गूढ अधिकच वाढले असून नागरिकांन मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिरवळ पोलीस या  प्रकाराबाबत लवकरच अधिकृत माहिती घेणार असून नागरिकांनी घाबरून न जाता अफवा पसरऊ नयेत तसेच सतर्क रहावे असे आवाहन शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदिप जगताप यांनी केले आहे.

बातमी व जाहिरातींसाठी संपर्क- किरण मोरे (9011555123)


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page