♦️कंपनीच्या रोडच्या कामात दमदाटी करून अडथळा आणले प्रकरणी चौंघांवर गुन्हा…
▲ शिरवळ, दि. २१- पळशी गावचे हद्दीत असणाऱ्या छेडा इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या सुरु असलेल्या कामाच्या ठिकाणी जाऊन दमदाटी करून काम बंद केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून शिरवळ पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,
पळशी येथे छेडा इलेक्ट्रिकल्स या कंपनीचे रस्त्याचे काम सुरू होते ते काम सुरू असताना दि. २२ रोजी दुपारी दोनच्या सुमारास शिरवळ येथील पप्पू उर्फ अजिंक्य कांबळे, हितेश जाधव, सनी टापरे व एक अनोळखी या चार जणांनी मशीन ऑपरेटर व साईट इंजिनियर यांना तुम्ही या ठिकाणी काम करू नका, आमचे कंपनी सोबत बोलणे सुरु आहे व आम्ही स्थानिक असल्याने हे काम आम्हीच करणार, तुम्ही काम केल्यास तुमचे मशीन फोडून टाकू अशी धमकी देत दमदाटी करत काम बंद पाडले.
सदर प्रकार कंपनीच्या व्यवस्थापकांसमोर घडल्याने त्यांनी कंपनीचे मालक उत्कर्ष मिलिंद जाधव-पाटील यांना कळवले असता त्यांनी काम सुरू करण्यास सांगितल्याने काम पुन्हा चालू करण्यात आले. यानंतर दुसऱ्या दिवशी दि. २३ रोजी काम सुरू असताना हितेश जाधव, सनी टापरे व एक अनोळखी यांनी पुन्हा दमदाटी करून काम बंद पाडले.
नंतर पुन्हा दि. २८ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास हितेश जाधव हा युवक पुन्हा कामाच्या ठिकाणी आला व साईट इंजिनियर विवेक चव्हाण यांना दमदाटी केली तसेच निरीक्षणासाठी असलेले अर्जुन मिरजकर यांना तुझी मशीन फोडून टाकेन अशी धमकी दिलेली आहे अशा आशयाची तक्रार उत्कर्ष कॉस्ट्रोवेल चे मॅनेजर राहुल भिंगारदिवे यांनी दाखल केली असून पुढील तपास शिरवळ पोलीस करीत आहेत.
बातमी व जाहिरातींसाठी संपर्क- किरण मोरे (9011555123)